साध्वी बलात्कार प्रकरणी तुरुंगात गेलेल्या राम रहिम जिथं पासून आत गेला आहे त्याच्यावरील मेम्स आणि त्याचे कांड रोजच्या रोज बाहेर येत आहेत. वासनांध बाबा डेऱ्यातील शाळा व अनाथालयात राहणाऱ्या अल्पवयीन मुलींवर बलात्कार करायचा. यातून ज्या मुलींना दिवस जायचे त्या मुलींचा डेऱ्यातील रुग्णालयात गर्भपात केला जायचा असा खळबळजनक आरोप बाबाच्याच एका समर्थकाने केला आहे. गुरुदास सिंह असे त्याचे नाव असून बाबा विरोधात बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवणार असल्याचे त्याने म्हटले आहे.बाबाबद्दल बोललो तर संसार मोडेल या भीतीने अनेकजणी तोंड उघडत नसल्याचे सिंह याने म्हटले आहे.
यातील एक महिला लग्नानंतर पतीबरोबर परदेशात स्थायिक झाली आहे. पण व्हॉट्सअॅपवर तिने मला तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती शेअर केल्याचे सिंह याने म्हटले आहे. ही महिला जेव्हा डेऱ्यात पाचवी इयत्तेत शिकत होती तेव्हा बाबाने तिचे लैगिक शोषण केले. याबद्दल घरातल्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत पुन्हा आपल्याला शाळेत पाठवले असे या महिलेने व्हॉट्सअॅपवर सिंह यांना सांगितले असे सिंह यांचे म्हणणे आहे. बाबाच्या कुकर्मामुळे दिवस गेलेल्या तीन मुलींचा गर्भपात आपल्या डोळ्यासमोर करण्यात आल्याचे सिंह याने म्हटले आहे.